अति-अरुंद ट्रॅक्टर
ट्रान्स्ट्रक®
ट्रान्सट्रॅक द्राक्ष, ऊस, कापूस, केळी, बेड पिके आणि फळबागा यांसारख्या उभ्या पिकांच्या रांगांमधून जाण्यासाठी अति-अरुंद ट्रॅक्टर बनवते.
२६ इंच (६६ सेमी) रुंदी असलेला, घोडा किंवा बैलाइतका अरुंद, क्रॉलर ट्रॅक्टर ३ फूट किंवा त्याहून अधिक पिकाच्या सरीमधून जाऊन अंतर-मशागत करतो. २१ एचपी क्रॉलर ट्रॅक ३ पट ट्रॅक्शन (कर्षण) प्रदान करतो - पारंपारिक ५५ एचपी टायर ट्रॅक्टरच्या समतुल्य.
2 मिनिटांचा व्हिडिओ: www.transtrak.co
आजचा शेतकरी
एका भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीची मशागत करण्यासाठी यापैकी ५ पर्यायांमधून फिरून संघर्ष करावा लागतो - मॅन्युअल किंवा मशीनीकृत:
मोठा ट्रॅक्टर | ३० ते ५५ एचपी |
कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर | १५ ते ३० एचपी |
पॉवर टिलर किंवा रोटरी वीडर | ३ ते १२ एचपी |
कामगार | ४ ते २० प्रति एकर |
बैल | एक जोडी |
यापैकी कुठलाही, एक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करत नाही. आणि एकत्र येऊनही, ते फक्त अर्धवट काम करतात!
शेतीला खरोखर काय पाहिजे
ट्रान्सट्रॅक ट्रॅक्टर
सिंगल वळणारा ट्रॅक
जगातील पहिला आणि एकमेव सिंगल क्रॉलर ट्रॅक जो वळतो, हा या तंत्रज्ञानाचा गाभा आहे. इतिहासात, ट्रॅक्टरचा शोध लागल्यापासून ११५ वर्षांनी, कधीही एकच स्टील क्रॉलर ट्रॅक स्वतः वाळू करू शकला नाही.
एकच ट्रॅक अरुंद असतो आणि त्यामुळे अरुंद जागांमधून चालता येते, तो शेतीच्या सरीमध्ये अंतर-मशागतिसाठी अत्यंत योग्य आहे.
अरुंद तरीही भरपूर कर्षण
हा ट्रॅक पारंपारिक टायर ट्रॅक्टरच्या 3 पट जास्त कर्षण प्रदान करतो, त्यामुळे लहान ते मोठ्या ट्रॅक्टर अवजारांसाठी सर्व मशागतीची कामे सहजपणे पूर्ण करतो.
यामुळे ते सर्व शेतीच्या कामांसाठी योग्य बनते - मग ते उभ्या पिकांच्या ओळींमध्ये असो किंवा नांगरणी, डिस्क हॅरो इत्यादी खुल्या शेतातील कामांसाठी असो.
ओढणे आणि ढकलणे
या ट्रॅकमध्ये सम-कर्षण आहे म्हणजेच समान ढकलणे आणि ओढण्याचे कर्षण बळ आहे, त्यामुळे त्याला पुढे ढकलण्यासाठी/डोझरसाठी अवजारे/अॅक्सेसरीज आणि मागे ओढण्यासाठी अवजारे/अॅक्सेसरीज बसतात. हे टायर ट्रॅक्टरच्या विपरीत आहे, जे फक्त ओढू शकतात, पण अवजारे ढकलू शकत नाहीत.
बहुरूपी आणि बहुईउपयोगी ट्रॅक्टर
ट्रान्सट्रॅक ट्रॅक्टर एक बहुरूपी ट्रॅक्टर आहे - जो कोणत्याही साधनांची आवश्यकता नसताना १५ मिनिटांत रूप बदलतो.
रूपांतर: स्टील ट्रॅक ते रबर टायर
रबर टायर मध्ये रूपांतर डांबरावरील रस्त्याच्या वाहतुकीसाठी आहे. ट्रॅक्टर सामान्य डांबराच्या रस्त्यांवर ५ टन वजनाचा ट्रेलर ओढतो.
मातीवर स्टील आणि रस्त्यावर रबर!
व्यासपीठ
ट्रान्सट्रॅकचा अरुंद सिंगल वळणारा ट्रॅक हा एक व्यासपीठ आहे जो:
- २६ इंच (६६ सेमी) अरुंद आहे
- १२५० किलोबळ कर्षण आहे, ओढणे आणि ढकलणे समान
- ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला ३७५ किलो आणि मागच्या बाजूला ३७५ किलो वजन वाहून नेऊ शकते आणि त्तिरिक्त ५०० किलो वजन ट्रॅक्टरवर देखील वाहू शकते.
- समोर, मागील किंवा ट्रॅक्टर शेजारी २० एचपीचा लवचिक रोटरी पॉवर टेक ऑफ (पीटीओ) आहे.
- कोणत्याही साधनांशिवाय १५ मिनिटांत स्टील ट्रॅक ते रबर टायरमध्ये रूपांतरित रस्त्यांसाठी होऊ शकते.
हे एक लहान पण ताकतवान बहुरूपी व्यासपीठ आहे. भार वाहून नेण्याची क्षमता, भार ढकलण्याची/खेचण्याची क्षमता आणि रोटरी पॉवरसह - हे व्यासपीठ अवजारे, इम्पलिमेन्ट आणि अनुप्रयोगांच्या बहुपयोगासाठी बनवलेले आहे.
शेतीसाठी ट्रॅक्टरचे अनेक उपयोग खाली दिले आहेत जे आपण आज कल्पना करू शकतो. ही फक्त एक सुरुवात आहे - आज आपण ज्याची कल्पना करू शकतो. आम्हाला विश्वास आहे की शेतकरी समुदाय आपल्या दृष्टीच्या पलीकडे जाऊन बरेच उपयोग शोधेल.
शेतकऱ्यांना असे व्यासपीठ देण्याचा आमचा अथक प्रयास आहे, ज्याचे आजच्या आपल्या कल्पनेपलीकडे दूरगामी फायदे असू शकतात.
द्राक्ष (द्राक्षबागा)
द्राक्ष हे जगातील सर्वात कठीण पीकांपैकी एक आहे - परंतु सर्वात जास्त पैसे कमावणारे पीक देखील आहे. ओळी अरुंद आहेत, त्यांना नियमित देखभालीची आवश्यकता असते - ज्यामध्ये तण काढणे, मातीची चाळण करणे, फवारणी करणे आणि छाटणी करणे इत्यादींचा समावेश आहे.
हे सर्व खूप श्रमप्रधान आहे - जे शेतकऱ्याला गुडघे टेकवण्यास भाग पाडते.
सध्याच्या उपायांमध्ये लहान, ट्रॅक्शन-विरहित ट्रॅक्टर आहेत, जी अवजड आहेत. ही महागडी, आणि खूपच अवजड आहेत. तसेच, मुख्यतः कठीण अवजारे ओढण्यासाठी ट्रॅक्शनचा अभाव आहे.
ट्रान्सट्रॅकचा फायदा म्हणजे २६ इंच (६६ सेमी) अरुंद, ३ पट कर्षण, कंबरेपेक्षा कमी उंची आणि वर्षभर द्राक्षवेलीची देखभाल करण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व मेहनत करतो!
ऊस
मजुरीच्या खर्चासाठी आणखी एक प्रसिद्धी ऊसाची आहे. द्राक्षांप्रमाणेच - अरुंद अंतर, सतत माती लावणे, तण काढणे आणि मातीची चालण करणे आवश्यक आहे. यासाठी कर्षण आणि पीटीओ पॉवर आवश्यक आहे.
सध्याच्या उपायांमध्ये रोटरी टिलर किंवा वीडर आणि शेवटी मजूर लावणे यांना पारियाय नाहीं. गेल्या ३० वर्षांत प्रति एकर उत्पादन ५०% पेक्षा जास्त कमी झाले असताना, मजूर लावणे (किंवा त्यापेक्षा मजूर शोधणे) अत्यंत महाग झाले आहे.
ट्रान्सट्रॅक हे एक वरदान आहे, आम्ही गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ उसावर मेहनत करत आहोत आणि मिळालेला अभिप्राय थक्क करणारा आहे! शेतकऱ्यांना लवकरात लवकर ट्रॅक्टर खरेदी करायची आहे!
कापूस
पृथ्वीवर चार खंडांमध्ये कापूस मुबलक प्रमाणात पिकवला जातो, परंतु समस्या एकच आहे: ३-५ फूट अंतरामुळे ट्रॅक्टर जात नाहीत, तरीपण माती आणि पीकाच्या देखभालीची जास्त गरज असते. तिथे पिकाच्या दर्जाचे आणि उत्पन्नाचे मोठे नुकसान होत आहे. इथे फक्त ट्रान्सट्रॅकच कामगारमुक्त, सोपा उपाय असू शकते.
इतर
अरुंद, शक्तिशाली ट्रॅक्टरचा इतर पिकांनाही खूप फायदा आहे जसे की:
- केळी
- आले, हळद, मसूर यांसारखे बेडवरची पीके
- वेली आणि हॉप्स
- फळबागा
- चहा, कॉफीचे मळे
आम्हाला असे वाटते की ट्रान्सट्रॅक अरुंद ट्रॅक्टरला कुठलाही पर्याय नाहीं.
उपलब्धता
ट्रान्सट्रॅक ट्रॅक्टर आता महाराष्ट्रात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.
संपर्क करा
ईमेल: info@transtrak.co
ऑफिस फोन/व्हॉट्सअॅप: +९१-९६०७०-५५११२
Comments
Post a Comment